अमरावती :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ‘प्रादेशिक समन्वय संस्था’ आणि ‘उन्नत भारत अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने व रसायन तंत्रज्ञान विभाग, भूविज्ञान विभाग आणि सहभागी संस्थांच्या सहकार्याने “विकसित भारतासाठी उन्नत भारत अभियान: सामुदायिक उपक्रम” या विषयावर उद्या दि. 13 मार्च रोजी विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण विकासाला गती मिळावी, तांत्रिक ज्ञानाचा वापर करून समाजपरिवर्तन या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द समाजसेवक, मेळघाटच्या बैरागड येथील पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेमध्ये तांत्रिक सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील एम.बी.ए. विभाग व चेंज मेकर फाऊंडेशन, नागपूरचे सीईओ डॉ. निखिल अटाळे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, लोहारा, यवतमाळ येथील उन्नत भारत अभियानचे समन्वयक डॉ. संदीप सोनी, अॅग्री स्टार्टअप कृष्णामाय आयुर्योग प्रा.लि., अमरावतीचे संचालक डॉ. विश्राम भगत हे मार्गदर्शन करतील.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उन्नत भारत अभियानचे समन्वयक डॉ. एम. बी. कुंभारे, रासायनिक तंत्रशासत्र विभागप्रमुख डॉ. ए. बी. नाईक, भूविज्ञान विभागप्रमुख डॉ. वाय. के. मावळे यांनी केले आहे.
Trending
- गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधन प्रकलपाची राज्यस्तरावर दखल
- परिमंडळात २०१.६४ कोटींची थकबाकी; बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन
- संत गाडगेबाबांची दशसूत्री व ग्रामविकासावर अमरावती विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा
- कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
- Wetlands Photography Exhibition
- डिजिटल व तत्पर वीज बिल भरण्याचा फायदाअमरावती परिमंडळातील ग्राहकांनी कमावले ७ कोटी रूपये
- विद्यापीठात ‘उन्नत भारत अभियान’ विषयावर उद्या एकदिवसीय कार्यशाळा
- राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न

