अमरावती : उच्च शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी 2008 मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची सुरुवात केली. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर आणि पी.पी.जी. (पीएच.डी) या गटांमध्ये जिल्हास्तर, विद्यापीठ स्तर आणि आंतर विद्यापीठ (महाराष्ट्र राज्य) स्तरावर घेण्यात येते. यावर्षी 18 वी आविष्कार स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठद्वारा संचालित मॉडेल डिग्री कॉलेज बुलडाणा येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी पी.पी.जी. (पीएच.डी) गटामध्ये आपला संशोधन प्रकल्प बुलडाणा जिल्हा स्तरावर सादर केला. त्यांच्या गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग या संशोधन प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून…
Author: Team Agro Timess
यवतमाळ: अमरावती परिमंडळाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे तब्बल २०१ कोटी ६४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात येत असून कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल वसुली करत आहेत. त्यामुळे संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, ‘बळीराजा मोफत वीज योजना’ ही सर्व कृषीपंपधारकांसाठी लागू नसून केवळ ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेच्या कृषीपंपांसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत शासनाने २०२५ ते २०३० या कालावधीत अशा पंपांचे चालू वीजबिल शून्य केले आहे. मात्र ७.५ एचपी…
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २३ मार्च २०२६ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संत गाडगेबाबांची दशसूत्री व ग्रामविकास’ हा या कार्यशाळेचा मुख्य विषय असून, ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज आणि विकास प्रक्रियेवर यात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल रिसर्च सेंटर येथे सकाळी ११:०० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. हर्षवर्धनजी देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा चे आजीवन प्रचारक आचार्य श्री. हरिभाऊ वेरुळकर…
मुंबई: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली आहे. बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डसाठी रस्ते,…
This competition celebrates the ecological, cultural, and social value of wetlands, highlighting how traditional knowledge, practices, techniques, and rituals of local and Indigenous communities’ safeguards wetland ecosystems from India. Entries should highlight the rich biodiversity and interconnectedness of India’s wetlands to other ecosystems, and/or the cultural heritage linked to wetland stewardship. Both nature and community photographs are welcome. The three broad categories for which submissions are welcome – Wetland Landscapes: Rivers, marshes, mangroves, peatlands, estuaries, lakes, salt pans, lagoons, riverine floodplains. Wetlands Biodiversity: Flora, fauna, macro/micro life, species interactions, life cycles. Culture & Traditional Knowledge: Practices, tools, skills, festivals, livelihoods, crafts, and community…
यवतमाळ : वीज ग्राहकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने वीज विषयक सर्व सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेत अमरावती परिमंडळातील वीज ग्राहकांनी चालू आर्थिक (२०२५-२६) वर्षात तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपयाची सवलत मिळवली आहे. महावितरणकडून ग्राहकांना वीज बिल वेळेत भरण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात. बिल जारी झाल्यानंतर सात दिवसांच्या आत वीज बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून) १ टक्के तत्पर बिल भरणा सूट दिली जाते. तसेच नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅश कार्ड किंवा यूपीआय…
अमरावती :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ‘प्रादेशिक समन्वय संस्था’ आणि ‘उन्नत भारत अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने व रसायन तंत्रज्ञान विभाग, भूविज्ञान विभाग आणि सहभागी संस्थांच्या सहकार्याने “विकसित भारतासाठी उन्नत भारत अभियान: सामुदायिक उपक्रम” या विषयावर उद्या दि. 13 मार्च रोजी विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण विकासाला गती मिळावी, तांत्रिक ज्ञानाचा वापर करून समाजपरिवर्तन या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द समाजसेवक, मेळघाटच्या बैरागड येथील पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे उपस्थित…
अमरावती : निसर्ग आणि मानवाचे नाते उलगडण्यासाठी ट्रेकिंग हे एक उत्तम माध्यम असून, त्यातून मिळणारा अनुभव हा खऱ्या अर्थाने जीवनाचे शिक्षण देणारा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू यांनी साहसी क्रीडा शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दि. 7 ते 11 मार्च दरम्यान चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्था येथे राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. निलेश कडू, डॉ. राजेश जयपूरकर डॉ. जयंत वडतकर, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. उमेश पाटणकर, श्री राघवेंद्र मुन व सौ. वंदना मुन…
मुंबई : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने स्मार्ट ग्रीड अंतर्गत विकसीत केलेली ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषदेमध्ये शुक्रवारी (दि. १३) या तंत्रज्ञानासाठी महावितरणचा ‘आयएसजीफ इनोव्हेशन अवॉर्ड २०२६’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथे ‘इंडिया स्मार्ट युटिलिटी विक २०२६’ अंतर्गत १२व्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषद झाली. महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ची अंमलबजावणी व फलनिष्पत्तीचे सादरीकरण तीत करण्यात आले. त्याचा अभ्यास करून पाच सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीने या तंत्रज्ञानाची परिषदेतील सर्वोत्तम…
मुंबई: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी १ लाख ८ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे व अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या थेट उपयोगाच्या या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना १ ऑक्टोबर…
